बोईसर अंधारात, मनसे आक्रमक — वीज विभागाला आंदोलनाचा इशारा!"
"बोईसर अंधारात, मनसे आक्रमक — वीज विभागाला आंदोलनाचा इशारा!"
"बिलं वेळेवर घेतात, सेवा मात्र उशिरा — मनसेचा संतप्त सवाल!"
या सर्व प्रकाराला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगपू यांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मनसेने स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली की, "वेळीच वीज सेवा सुरळीत केली नाही, तर ‘मनसे स्टाईल’ने टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल."
बोईसर ग्रामीण उपविभागात सुमारे १.२५ लाख वीज ग्राहक असून महिन्याला ९ ते १० कोटी रुपयांचा महसूल वीज वितरण कंपनीला मिळतो. एवढ्या उत्पन्नानंतरही नागरिकांना २४ तास सुरळीत सेवा मिळत नाही, ही बाब अत्यंत गंभीर असून दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
संवेदनशील भागातही सेवा कोसळली
या विभागात तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणु संशोधन केंद्र आणि तारापूर एमआयडीसी यासारख्या संवेदनशील आणि धोरणात्मक महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत. या क्षेत्रात वीज खंडित होणे केवळ गैरसोयीचे नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकते, असा मनसेचा आरोप आहे.
रुग्णांचे हाल, नागरिकांचा संताप
वीज नसल्यामुळे अनेक रुग्णालयांत अंधारातच सेवा दिली गेली. गरजूंना उपचार मिळाले नाहीत. पाण्याची मोटारी बंद पडल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले व गंभीर रुग्णांचे अतोनात हाल झाले.
मनसेचा सवाल — “बिलं वेळेवर, सेवा उशिरा का?”
"वीज ग्राहकांकडून वेळेवर बिल वसूल केलं जातं, पण वीज मात्र वेळेवर मिळत नाही. ही दुटप्पी भूमिका सहन केली जाणार नाही. प्रत्येक ग्राहकाला झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी," अशी ठाम मागणी मनसेने निवेदनातून केली आहे.
...अन्यथा टाळे ठोको आंदोलन निश्चित!
“आपण सेवा सुधारली नाहीत तर संपूर्ण वीज ग्राहकांना घेऊन मनसे स्टाईलने कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले जाईल आणि कार्यालयावर टाळे ठोकले जाईल,” असा जाहीर इशारा देत मनसेने वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहे.
यावेळी विशाल जाधव, उपजिल्हा अध्यक्ष, अनंत दळवी कामगार सेना सचिव, हेमांगी राऊळ तालुका अध्यक्ष, वैभव नाईक उपतालुका अध्यक्ष, जालीम तडवी कामगार सेना सचिव व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment