एटीएम पिन बनवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची २५ हजारांची आर्थिक फसवणूक!
एटीएम पिन बनवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची २५ हजारांची आर्थिक फसवणूक
बोईसर : बोईसर येथील बँक ऑफ बडोदा एटीएममध्ये एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची हातचलाखी करून २५,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
रामकरण हिरालाल यादव (रा.केशवनगर बोईसर) यांनी बोईसर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता बँक ऑफ बडोदा शाखेजवळील एटीएममध्ये ते गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या एका अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील, हाफ बाह्यांचा नारंगी टी-शर्ट घातलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांची मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतले आणि नवीन पिन जनरेट केला. त्यानंतर त्याच व्यक्तीने हातचलाखी करत त्यांना दुसरे कार्ड दिले व त्यांच्या मूळ कार्डाचा वापर करून, २५,००० रुपये काढून घेतले.
ही घटना ५ मे रोजी संध्याकाळी उघडकीस आली आणि तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरण भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अंतर्गत दाखल करण्यात आले असून आरोपी अद्यापही फरार आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Comments
Post a Comment