मृत व्यक्तीला "जिवंत" दाखवून जमीन विक्री – दोघांविरोधात गुन्हा दाखल

मृत व्यक्तीला "जिवंत" दाखवून जमीन विक्री – दोघांविरोधात गुन्हा दाखल

पालघर : पालघर शहरात एका गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, मृत व्यक्तीला जिवंत असल्याचे दाखवून तिच्या नावाने जमीन विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघा जणांविरोधात पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुनिल महादेव गायकवाड (वय ४६, व्यवसाय – व्यापारी, रा. आंबेडकर नगर, पालघर पूर्व) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पालघर येथील सर्व्हे नंबर ११९/१, क्षेत्र ०-१९-० (००.३८ आर) इतकी जमीन ही त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सामायिक मालमत्ता आहे. या जमिनीत त्यांची नातेवाईक कल्पना ऊर्फ कमल काशिनाथ गायकवाड यांचा देखील हिस्सा होता. मात्र, त्या काही वर्षांपूर्वीच निधन पावल्या होत्या.


तथापि, १) राजप्रकाश मंगलदेव पाठक आणि २) इकबाल हुसेन इल्तेजा हुसेन शेख (दोघेही रा. पालघर) यांनी कल्पना गायकवाड या जिवंत असल्याचे भासवणारे खोटे घोषणापत्र तयार केले. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन ती इतरांना विकली. या व्यवहारामुळे गायकवाड कुटुंबाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.


ही घटना ९ मे २०२५ रोजी दुपारी उघडकीस आली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपींविरोधात भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


पालघर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरु आहे. 


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक