पालघर पोलीस अधीक्षक आणि कासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा सत्कार

पालघर पोलीस अधीक्षक आणि कासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा सत्कार

पालघर– संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालयाचा प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पालघर जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला. यानिमित्त, रमजान ईद आणि गुढीपाडवा या सणांचे औचित्य साधून, फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट, मस्जिद-ए-रहमान, तारापूर यांच्या वतीने पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

◾पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा 

हा सत्कार मंगळवार, १ एप्रिल २०२५ रोजी ट्रस्टचे अध्यक्ष अयाजुद्दीन शेख (आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, नवी मुंबई) यांच्या हस्ते झाला. पालघर जिल्ह्याला मिळालेला हा मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे, आणि त्याचे संपूर्ण श्रेय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमला जाते, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

तसेच, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यालयातील सर्व उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

◾कासा पोलीस स्टेशनचा विशेष सन्मान सत्कार

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून प्रथम क्रमांक, तसेच भारतभरात १५ वा क्रमांक मिळाल्याबद्दल कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचाही सत्कार करण्यात आला. हा सन्मान ट्रस्टचे अध्यक्ष अयाजुद्दीन शेख यांच्या हस्ते  करण्यात आला.

या वेळी DySP विकास नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास कणसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी फलाह एज्युकेशन ट्रस्ट ला मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष रफिक शेख, सरचिटणीस जैनुद्दीन शेख, खजिनदार अफझल शेख, सदस्य खुदादाद शेख, नासरुद्दीन शेख, समद शेख, अताउल्लाह मारकंडे, अतिक शेख, इब्राहीम शेख, कौसर शेख, अब्दुल अहद शेख, बहार शेख आदी उपस्थित होते.

पालघर जिल्हा पोलीस दलाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेणारा आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा सन्मान करणारा हा विशेष सत्कार  एज्युकेशन ट्रस्ट तारापूर तर्फे करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक