बोईसर: टॅप्स हॉस्पिटल समोर मारुती एसटीलो वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

बोईसर: टॅप्स हॉस्पिटल समोर मारुती एसटीलो वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

डॉक्टरांवर गंभीर आरोप आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी



बोईसर – पतीच्या उपचारासाठी टॅप्स हॉस्पिटल येथे आलेल्या छायालता विश्वनाथ आरेकर (वय ७०, रा. गेली, ता. व जिल्हा पालघर) यांचा एका भरधाव मारुती एसटीलो वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी सुमारे ८:५५ वाजता ही घटना घडली.

MH 04 EX 2960 क्रमांकाची मारुती एसटीलो गाडी भरधाव वेगाने येत रुग्णालयाच्या आवारात छायालता आरेकर यांना जबर धडक देऊन गेली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती नुसार, या गाडीचे मालक डॉक्टर आर. के. दास आहेत, जे टॅप्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

अपघाताच्या ठिकाणी केवळ रुग्णवाहिकांना प्रवेशाची परवानगी असताना, खासगी वाहन कसे प्रवेश करु शकले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आर. के. दास यांच्यावर गंभीर आरोप करत, "डॉक्टर नशेत तर नव्हते ना?" असा सवाल उपस्थित केला आहे.


घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची आणि सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.


घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून गाडी ताब्यात घेण्यात आली असून, आरोपी डॉक्टरवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक