फलाह एज्युकेशन ट्रस्ट तारापूर तर्फे बक्षीस वितरण समारोह
फलाह एज्युकेशन ट्रस्ट तारापूर तर्फे बक्षीस वितरण समारोह
तारापूर : फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट, मस्जिद ए रहमान तारापूर तर्फे अरबी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारोह मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षत्व फलाह एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अयाज शेख यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रालय येथील नूर मस्जिदचे अध्यक्ष बदरुद्दीन बुधवानी, विशेष अतिथी म्हणून तारापूर पोलीस ठाण्याचे अनिल वाळवी, संजय वाळवी तसेच मुस्लिम सुन्नत जमातचे सचिव मुफीद गवंडी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुरआन व नात ए पाक यांसोबत करण्यात आली. या दरम्यान मदरशातील विद्यार्थ्यांनी कुरान की तीलावत, नाते पाक, सवाल-जवाब आणि हदीस या कार्यक्रमांचा प्रस्तुत केला.
मुख्य पाहुणे बदरुद्दीन बुधवानी यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "आपल्या मुलांचा शिक्षणाकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षण हीच आपली प्राथमिकता असावी." कार्यक्रमाचे अध्यक्ष अयाज शेख यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की, "आई-वडील कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. आपण आपल्या मुलांचा अभ्यास आणि त्यांच्या शालेय जीवनावर लक्ष ठेवले पाहिजे."
कार्यक्रमात डॉ. मुसब मुजीब शेख यांचा डॉक्टरी पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला, ज्याचे नेतृत्व तारापूर पोलीस ठाण्याचे संजय वळवी आणि अनिल वळवी यांनी केले. तसेच, एच. एस. सी. मध्ये 85% गुण मिळवलेल्या सुमय्या खालीद शेख आणि एस. एस. सी. मध्ये 86% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या युमना अतिक शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला.
खतमे कुरान करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना पारितोषक देण्यात आले. कार्यक्रमात एकूण 45 विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पारितोषक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोषाध्यक्ष अफजल शेख, समद शेख, इलियास शेख, हुसेन शेख, कौसर शेख, अतिक शेख, सईद शेख, अय्युब शेख, अक्रम (अक्कू) शेख, जैद शेख, सफवान शेख यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि नियोजन मौलाना नियाज यांनी केले.
या विशेष कार्यक्रमात अशरफ रंगरेज, डॉ. परवेझ दमनवाला, खुदादात मार्कंडे, इलियास शेख, आताऊल्ला मार्कंडे, नसरुद्दीन शेख, इब्राहिम शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment