गावकऱ्यांची दिशाभूल करून पोलीस पाटलांवर खोटी तक्रार; सहा जणांवर गुन्हा दाखल

गावकऱ्यांची दिशाभूल करून पोलीस पाटलांवर खोटी तक्रार; सहा जणांवर गुन्हा दाखल

विक्रमगड : आपटी खुर्द गावातील पोलीस पाटील सौ. विद्या विजय पाटील यांच्या विरोधात खोटी तक्रार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध विक्रमगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिता अंकुश वाघ (वय ५० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आपटी खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रविंद्र बच्चू रिंजड (वय ४५), सुधीर विश्वनाथ पाटील (वय ३९), रोहित भाई पाटील (वय २४), स्वप्निल मुकुंद पाटील (वय ३६), प्रमोद विश्वनाथ पाटील (वय ४९) आणि गजानन श्रीधर पाटील (वय ४४) या आरोपींनी गावातील नागरिकांची दिशाभूल करून गावठण मोजणी व शौचालय बांधणीसाठी सह्या व अंगठे गोळा केले. त्यानंतर या सह्या व अंगठ्यांचा वापर करून गावचे पोलीस पाटील सौ. विद्या विजय पाटील यांच्या विरोधात प्रांत कार्यालय तसेच विक्रमगड येथे खोटी तक्रार सादर करण्यात आली. 


सौ. विद्या विजय पाटील या गावात प्रामाणिकपणे व चोख कार्य करत असतानाही त्यांच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यामुळे विक्रमगड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४६९ (खोट्या कागदपत्रांची निर्मिती), ५०० (मानहानी) आणि ३४ (सामुहिक हेतू) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, याच घटनाक्रमात मयत धीरज सिंग पनवार (वय अंदाजे २५ ते ३० वर्षे) याचीही नोंद करण्यात आली आहे, मात्र त्यांचे मूळ गाव अद्याप निष्पन्न झालेले नाही.


ही संपूर्ण घटना दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७.५२ वाजता उघडकीस आली असून, विक्रमगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक