पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे घरांना धोका; भूसुरुंग स्फोटांमुळे परिसरातील घरं धोकादायक
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे घरांना धोका; भूसुरुंग स्फोटांमुळे परिसरातील घरं धोकादायक
पालघर : देशाच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र या कामादरम्यान अनेक नियमांचा उल्लंघन केला जात आहे. विशेषतः डहाणू सारख्या हरित पट्ट्यात भूसुरुंग स्फोट केल्यामुळे परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे.
डहाणू हा हरित पट्टा असल्याने येथे खोदकाम करताना भूसुरुंग स्फोट करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरी देखील, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीने गोवने परिसरात अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या वेळी भूसुरुंग स्फोट केले. यामुळे परिसरातील अनेक नव्याने उभारलेली घरे वारंवार हादऱ्यामुळे तुटली आहेत आणि त्यांची भिंतींना तडे जाऊ लागले आहेत.
या प्रकारामुळे परिसरातील घरं धोकादायक झाली आहेत. स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकारी या गंभीर समस्येची गांभीर्याने दखल घेत नाहीत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
सध्या, येथील अनेक घरांच्या पायाभूत संरचनेला धक्का पोहोचला आहे, आणि येथील कुटुंबे भीतीच्या छायेखाली राहत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे त्यांचे घर आणि जीवनधारा धोक्यात आली आहे.
Comments
Post a Comment