घिबली ट्रेंडच्या मोहात पडाल तर होऊ शकते सायबर फसवणूक: एआय टूल्स वापरताना सावधगिरी बाळगा
घिबली ट्रेंडच्या मोहात पडाल तर होऊ शकते सायबर फसवणूक: एआय टूल्स वापरताना सावधगिरी बाळगा
पालघर : सध्या सोशल मीडियावर घिबली स्टाइल्समध्ये इमेजेस तयार करण्याचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झाला आहे. यामध्ये इंटरनेट वापरणारे लोक, कुटुंबातील सदस्यांचे किंवा स्वतःचे फोटो घेऊन त्यात घिबली स्टाइल इमेज तयार करून त्यांना सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मात्र, या ट्रेंडच्या मोहात पडल्याने तुमच्या व्यक्तिगत माहितीला धोका होऊ शकतो.
तज्ज्ञांचा इशारा असा आहे की, एआय टूल्सचा वापर करताना जरी मजा करत असलात तरी तुमचा फोटो किंवा बायोमेट्रिक डेटा चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडू शकतो. एआय टूल्सला संमती देताना तुमचा चेहरा किंवा अन्य व्यक्तिगत माहिती थर्ड पार्टीसाठी सहज उपलब्ध होतो, ज्यामुळे तुमचा चेहरा डार्क वेबवर विकला जाऊ शकतो. यामुळे ओळख चोरी, सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड, आणि डीपफेक तयार करण्यासारख्या गंभीर फसवणुकीचे संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात.
सुरक्षेसाठी उपाय:
▪️कोणत्याही एआय टूल्सचा वापर करताना सावधगिरी बाळगा.
▪️सोशल मीडियावर कमी रिझोल्यूशनचे फोटो अपलोड करा.
▪️शक्य असल्यास फेस अनलॉक वापरण्याऐवजी पिन किंवा पासवर्ड वापरा.
तज्ज्ञांचा सांगणे आहे की, एआय टूल्सचा वापर करत असताना सावधगिरी घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर होण्याचा धोका सतत वाढत आहे. काही गोपनीय माहितीचा उपयोग करत असताना तिला चुकवणे आणि फुकटच्या अॅपपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.
Comments
Post a Comment