बोईसर भाजी मार्केट मध्ये रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात, तात्काळ कारवाईची मागणी
बोईसर भाजी मार्केट मध्ये रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात, तात्काळ कारवाईची मागणी
बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील ब्लू डायमंड बाजूच्या भाजी मार्केट गल्लीत सुरु असलेल्या बिल्डिंग बांधकामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि खडी रस्त्यावर टाकल्यामुळे बाजारात येणारे ग्राहक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात त्रासदायक स्थितीत आहेत.
यात काल एका बाईकवाल्याच्या कुटुंबासोबत भाजी मार्केटमध्ये जात असताना, रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून बाईक स्लिप होऊन त्या व्यक्तीसह त्याचा लहान मुलगा आणि बायकोही खाली पडले. या अपघातात त्यांना किरकोळ मार लागला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी केल्या, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत भाजी मार्केटमध्ये येणारे ग्राहक आणि नागरिक जीव धोक्यात घालून बाजारात जात आहेत. यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे. ग्रामपंचायतीला या समस्येवर तत्काळ लक्ष देण्याची आणि संबंधित बिल्डरला रस्त्यावर टाकलेले साहित्य हटवण्याची सूचना देण्याची आवश्यकता आहे.
या बाबत ग्रामपंचायतीने अद्याप ठोस निर्णय घेतला नाही, ज्यामुळे 'बघ्याची भूमिका घेणार की कारवाई करणार?' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्वरित कारवाई करावी.
Comments
Post a Comment