मोटारसायकल थांबवून तरुणांना मारहाण – बोईसरमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मोटारसायकल थांबवून तरुणांना मारहाण – बोईसरमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बोईसर – बोईसर येथील संतोषीनगर भागात रस्त्यात अडवून तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास राजस्थान किराणा दुकानासमोर, संतोषीनगर भैय्यापाडा येथे घडली. फिर्यादी सुर्या दुरई तेवर (वय २१, व्यवसाय – शिक्षण, रा. संतोषीनगर, बोईसर) हे त्यांचे मित्र हर्शल आणि भावेश सोबत मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले.
आरोपी धिरज मांझी, संतोष पाटील, महमद पठाण आणि गुड्डु (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत एका आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने सुर्या तेवर याच्या डोक्यावर, उजव्या हातावर जोरदार मारहाण केली. तसेच, हर्शलच्या डोक्याच्या मागील बाजूस, हातावर आणि पायावर, तर भावेशच्या डोक्यावर आणि पाठीवर हल्ला केला.
या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (२०२३) कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment