२७.९५ लाखांचा सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त; राजस्थानातील दोन जण अटकेत

२७.९५ लाखांचा सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त; राजस्थानातील दोन जण अटकेत

पालघर : तलासरी परिसरात अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २७.९५ लाख रुपये किमतीचा सुगंधित सुपारी, तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यातील दोन चालकांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई २५ एप्रिल रोजी दुपारी ३.१० वाजता हिमाचल पंजाब ढाबा, मुंबई-गुजरात महामार्गावर करण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर संशयास्पद हालचाली दिसून येताच पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पो क्रमांक RJ-14-GR-9303 मधून मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ साठवलेले आढळून आले.


यात अटक करण्यात आलेले आरोपी श्यामपाल बहादुर सिंग (३६) आणि बीजेंदर रामनिवासकुमार (२८) यांनी राज्य सरकारच्या अधिसूचनेचा उल्लंघन करून आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केली होती. त्यांना रात्री १०.१८ वाजता अटक करण्यात आली.


जप्त मुद्देमाल:

सुपर कॅश गोल्ड सुगंधीत पान मसाला : २००० पाउचेस, किंमत २,४०,००० रुपये

VC-5 च्युइंग तंबाखू : १८६० पाउचेस, किंमत ५५,८०० रुपये

आयशर टेम्पो (RJ-14-GR-9303) : किंमत २५ लाख रुपये

एकूण जप्त मालाची किंमत २७,९५,८०० रुपये आहे.


या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता २०२३अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, अधिक आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका