शाहिद खान नंतर हरिओम मदेशियाचा बेकायदेशीर बांधकाम सुरू; बोईसर ग्रामपंचायतीकडून कारवाईसाठी टाळाटाळ"

"शाहिद खान नंतर हरिओम मदेशियाचा बेकायदेशीर बांधकाम सुरू; बोईसर ग्रामपंचायतीकडून कारवाईसाठी टाळाटाळ"

बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर येथे बेकायदेशीर बांधकामे सुरू केली जात आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर, बोईसर ग्रामपंचायतीकडून संबंधित बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली गेली होती. परंतु, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून "आम्हाला कारवाई करण्याचे अधिकार नाही" असे उत्तर मिळाल्यामुळे शंका निर्माण होत आहेत.

शाहिद खान यांच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न झाल्यानंतर आता हरिओम मदेशिया याने देखील बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने नोटीस बजावली असली तरी, त्यावरही कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकाराच्या मागणीला टाळाटाळ केली जात आहे, आणि अपील अधिकाऱ्यांकडून देखील "आम्हाला अधिकार नाही" असे उत्तर मिळत आहे.


दरम्यान, महसुली गाव काटकर येथील जाधव कुटुंबाच्या जागेवर हरिओम मदेशिया वाणिज्य स्वरूपाच्या कामासाठी बांधकाम करत आहेत, परंतु यासाठी ग्रामपंचायत किंवा प्राधिकरणाकडून कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही. याशिवाय, मान्यता मिळवण्यासाठी कोणतेही अर्ज देखील सादर केलेले नाहीत.


बोईसर ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील कार्यवाही करणार का, याबाबत भविष्यात काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक