फसवणुकीचा नवा प्रकार उघड – बोईसरमध्ये ७ लाखांची मोबाईल फसवणूक ; एकावर गुन्हा दाखल

फसवणुकीचा नवा प्रकार उघड – बोईसरमध्ये ७ लाखांची मोबाईल फसवणूक ; एकावर गुन्हा दाखल

बोईसर – बोईसर एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या गोडावूनमधून तब्बल ७,१९,४६५.२० रुपयांचे मोबाईल चोरी आणि फसवणुकीच्या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी फैजान फारुख शेख (रा. बेहरामपाडा, बांद्रा पूर्व, मुंबई) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भगवानजी रमाकांत प्रसाद (वय ३४) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २८ जानेवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अमेझॉन अ‍ॅपवरून विविध नावांनी एकूण २० ग्राहकांच्या नावाने महागडे मोबाईल फोन ऑर्डर केले. मात्र, हे मोबाईल उत्पादने कंपनीच्या गोडावूनमधून उचलून ते ग्राहकांना न देता स्वतःच्या वापरासाठी ताब्यात घेतल्याचे उघड झाले आहे.


सदर प्रकार ११ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री उजेडात आला. आरोपीने ऑर्डर केलेल्या मोबाईलची एकूण किंमत ७ लाख १९ हजार ४६५ रुपये इतकी असून, कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.


या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३१८(४), ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


बोईसरमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या अशा आर्थिक फसवणूक प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.






Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक