बोईसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर हल्ला
बोईसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर हल्ला
बोईसर – पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जुन्या वादातून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. १ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३.०४ वाजता टी. व्ही. एम. शाळेच्या पाठीमागील पत्रा कॉलनी येथे हा प्रकार घडला.
फिर्यादी संतोष बलभीम पाटील (वय ३२, व्यवसाय – क्रेन चालक, रा. पांडुरंग नगर, भैय्यापाडा, बोईसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भावेश उपेंद्र सिंग, समीर, निरज, बमबम, फय्याज, हिमांशु चौहान आणि त्यांचे ३-४ साथीदार यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात आरोपींनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला. त्यांच्यासोबत असलेल्या सोनू प्रसाद याला धक्का मारून खाली पाडण्यात आले. त्यानंतर लाठ्या-काठ्यांनी आणि ठोश्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी समीर याने दगडाने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली, तर भावेश, निरज आणि इतर आरोपींनी चेहऱ्यावर चापट्या आणि ठोसे मारून जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादीच्या ओठांवर आणि डोक्याला गंभीर मार लागला.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. १ एप्रिल रोजी पहाटे ५.२८ वाजता फिर्यादीने बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(१), १८९(२), १९१(२), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसर पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment