विराज प्रोफाइल कंपनीच्या स्टोअरमधून ९०,००० रुपयांचे फेरो मोली दगड आणि इतर साहित्याची चोरी
विराज प्रोफाइल कंपनीच्या स्टोअरमधून ९०,००० रुपयांचे फेरो मोली दगड आणि इतर साहित्याची चोरी
बोईसर – बोईसर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल प्रा.लि. कंपनीच्या उघड्या स्टोअरमधून अज्ञात चोरट्याने तब्बल ९०,००० रुपये किंमतीचे फेरो मोली (दगड) चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजयकुमार हरीलाल प्रजापती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या पूर्वी, एमआयडीसीतील प्लॉट नं. जी-३४ येथील उघड्या स्टोअरमध्ये दरवाजाच्या वाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ही चोरी केली.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये प्रत्येकी १ किलो वजनाचे फेरो मोलीचे दगड, एकूण ४५ किलो वजन, किंमत अंदाजे ९०,००० रुपये आणि त्याबरोबर इतर साहित्य मिळून एकूण १०,००० रुपये किंमतीचा माल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ११६७/२०२५ नोंदवून, भा.दं.वि. कलम ३०९ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
Comments
Post a Comment