विष्णू लक्ष्मी सिल्क मिलमध्ये कंपनीमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; हार्दिक कन्स्ट्रक्शनकडून दुर्लक्ष

विष्णू लक्ष्मी सिल्क मिलमध्ये कंपनीमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; हार्दिक कन्स्ट्रक्शनकडून दुर्लक्ष

बोईसर : हार्दिक कन्स्ट्रक्शन (सोनू जहांगीर)  या कडून विष्णू लक्ष्मी सिल्क मिल प्लॉट नं. S-17 या कंपनीत सुरू असलेल्या बांधकामात कामगारांच्या सुरक्षेची पूर्णपणे पायमल्ली केली जात असल्याचे समोर आले आहे. कोणतीही सुरक्षात्मक साधने न देता, कामगारांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.

संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे – जसे की हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल्स, शूज आदी – दिली जात नसल्याने मजूर जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. इतकंच नव्हे, तर या मजुराना ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) यांसारख्या मूलभूत सुविधा देखील पुरवण्यात आलेल्या नाहीत.


या प्रकरणी विचारणा केली असता कॉन्ट्रॅक्टरचे म्हणणे होते की, “हे सर्व मजूर नाक्यावरून घेतले जातात. ते दररोज बदलतात, त्यामुळे त्यांना सुविधा किंवा सुरक्षेची साधने पुरवले जात नाही.”


दुसरीकडे, विष्णू लक्ष्मी सिल्क मिल कंपनीच्या मॅनेजर लाविचारणा केली असता या प्रकरणापासून पळ काढत स्पष्ट केले की, “आम्ही हार्दिक कन्स्ट्रक्शनला हे काम दिले आहे. कामगार सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची आहे यांच्याशी आमचा काही संबंध नाही.


या साऱ्या प्रकारातून कामगारांच्या सुरक्षेबाबत कुणालाही जबाबदारी स्वीकारायची नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे सरकारकडून कामगार हक्कांचे संरक्षण केले जात असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र या हक्कांची सर्रास पायमल्ली होत आहे.


प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू करावी व संबंधित कंपनी व ठेकेदार वर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक