बोईसरच्या टपऱ्यांत 'अमनचा गुटखा' खुलेआम विक्रीला"

बोईसरच्या टपऱ्यांत 'अमनचा गुटखा' खुलेआम विक्रीला"

बोईसर : महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी घातली असतानाही, बोईसर शहरात सर्रास गुटख्याची विक्री सुरू असून, हे वास्तव अधिकच गंभीर बनले आहे. गुजरातमध्ये गुटखा विक्रीवर कोणतेही निर्बंध नसल्याने सेलवास, संजाण, बिलाड या सीमेलगतच्या भागांमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा तयार करून तो बोईसरसह पालघर जिल्ह्यात सहजपणे पोहोचवला जातो.

पोलिसांनी वेळोवेळी तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असताना बोईसर मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला आणला जात आहे विशेषतः बोईसर शिगाव रोडवरील किरकोळ व्यापारी हाफिजीचा अमन नावाचा गुटखा माफिया, हार्मोनी रेसिडेन्सी, रेल्वेस्थानक, डिजायर नगर, बसस्थानक परिसरात टपऱ्यांच्या माध्यमातून गुटखा पुरवतो आहे. या टपऱ्यांवर गोवा, विमल, रजनीगंधा यासारख्या ब्रँडचे गुटखा पाकिटे खुलेआम विकले जात आहेत.


ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये वारंवार तक्रारी करूनही बोईसर ग्रामपंचायतीकडून या टपऱ्यांविरोधात ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून चालढकल होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या टपऱ्या केवळ अवैध नाहीत, तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण करत आहेत, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


या विक्रीमुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, शासनाच्या बंदी आदेशाला पायदळी तुडवले जात आहे. नागरिकांनी आता अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. जर लवकरच प्रभावी पावले उचलली गेली नाहीत, तर बोईसरमध्ये गुटख्याचा हा बेकायदेशीर धंदा अधिकच विक्राळ रूप धारण करू शकतो.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक