बोईसर शहरात गुटखा विक्रीसाठी टपऱ्यांची संख्या वाढली, अवैध विक्रीत तगडी वाढ
बोईसर शहरात गुटखा विक्रीसाठी टपऱ्यांची संख्या वाढली, अवैध विक्रीत तगडी वाढ
बोईसर : महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही, बोईसर शहरात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. शहरातील टपऱ्या आणि किराणा दुकानदार खुलेआम गुटखा विकत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: हा गुटखा गुजरातमधून मोठ्या प्रमाणात तस्करी करून आणला जातो. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही, त्याचे वितरण डबल किंवा तिब्बट दराने सुरू असल्याने या प्रकरणी गुटखा माफिया सक्रिय झाले आहेत.
काही गुटखा माफियांनी गुटखा विकण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून मुख्य रहदारीच्या रस्त्यालगत, गल्लीत आणि इतर ठिकाणी टपऱ्या उभारून विक्री केली जात आहे. यामुळे, बोईसर शहरात टपऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या अवैध विक्रीचा परिणाम म्हणून तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
गुटख्याच्या तस्करीवर प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होत असताना, तरीही तो इतक्या मोठ्या प्रमाणावर बोईसरमध्ये कसा उपलब्ध होतो, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
नागरिकांमधून प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाकडे गंभीर कारवाईची मागणी केली जात आहे. जर प्रशासनाने लवकर पावले उचलली नाहीत, तर आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या विक्रीला आळा घालणे अधिक कठीण होईल.
Comments
Post a Comment