मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले; स्लीप होऊन बोर्डाला धडक – 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले; स्लीप होऊन बोर्डाला धडक – 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

पालघर : पालघर तालुक्यातील सातपाटी परिसरात भरधाव मोटारसायकलच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात दि. १ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजता शिरगाव-वडराई फाट्याजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहमद शहजाद इम्तीयाज अहमद शेख (वय २३, रा. पालघर) हा आपल्या MH47AL7943 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून शिरगाववरून पालघरच्या दिशेने जात होता. दरम्यान, त्याने भरधाव वेगात वाहन चालवताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची मोटारसायकल स्लीप झाली. यामुळे तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या रोडच्या बोर्डाला धडकला.


या भीषण अपघातात त्याला डोक्याला, छातीला, तोंडाला तसेच हात-पायाला गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


या घटनेबाबत मोहम्मद इरशाद इम्तियाज शेख (वय ४५, रा. पालघर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पालघर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी), १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी वाहन चालवताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक