शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बोईसर : बोईसर येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि ग्रामपंचायत उपसरपंच निलम संखे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हार्दिक संखे फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रिलीफ हॉस्पिटल आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात १४३ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी, ओपीडी सल्ला, रक्त तपासणी, हाडांची घनता तपासणी (BMD) आणि न्युरोपॅथी चाचण्यांचा लाभ घेतला. तसेच एक्स-रे, ब्लड टेस्ट आणि शस्त्रक्रियांसाठी सवलतीही देण्यात आल्या.
◾वाढदिवसाचा जल्लोष
या विशेष प्रसंगी पारंपरिक तारपा नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतीषबाजीत वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित नागरिकांसाठी पाणीपुरी आणि फळांचे मोफत वाटप करण्यात आले.
शिवसेनेत निस्वार्थ योगदान
२००१ पासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या निलम संखे यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २०२२ मध्ये पालघर उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षसंघटन बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर ८५ बूथच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली, ज्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला मोठा विजय मिळवता आला.
बोईसरच्या विकासासाठी सतत कार्यरत
ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर असताना निलम संखे यांनी अनेक विकासकामे हाती घेतली. शैक्षणिक, आरोग्य, आपत्कालीन सेवा आणि संस्कृती संवर्धनासाठी त्यांचे विशेष योगदान आहे.
✅ शैक्षणिक मदत – ना नफा-ना तोटा तत्वावर वह्या आणि गणवेश वाटप
✅ आरोग्य सेवा – मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे ✅ आपत्कालीन मदत – मोफत रुग्णवाहिका व शववाहिनी सेवा
✅ संस्कृती संवर्धन – भव्य दहीहंडी उत्सव, शिवजयंती, गणेशोत्सव
समाजसेवेसाठी समर्पित नेतृत्व
बोईसरच्या विकासासाठी निलम संखे अहोरात्र मेहनत घेत असून त्यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमांमधून त्यांच्या समाजसेवेची खरी ओळख अधोरेखित होते.
Comments
Post a Comment