वनहक्क दाव्यातील जमीन परप्रांतीयांच्या घशात ; प्रशासनाचे दुर्लक्ष?
वनहक्क दाव्यातील जमीन परप्रांतीयांच्या घशात ; प्रशासनाचे दुर्लक्ष?
बोईसर: गणेश नगर येथे वनविभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खोल्या व गाळे बांधण्याचे काम सुरू असून, या बांधकामांसाठी रॉयल्टी नसलेले साहित्य पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थानिक बांधकाम व्यावसायिक गुप्ता यांनी बाळूशेठ नावाच्या व्यक्तीवर हा साहित्य पुरवठ्याचा आरोप केला आहे.
वनविभागाने आदिवासी खातेदारांना वाटप केलेली जमीन कवडीमोल भावाने परप्रांतीयांना विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. प्रभात सिंह, पांडे, गुप्ता, शर्मा आणि तिवारी या व्यक्तींनी मिळून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीने काही प्रमाणात तोडक कारवाई केली असली, तरी बाळूशेठच्या संरक्षणामुळे हे बांधकाम पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, गणपत गडक यांच्या वनहक्क दाव्यातून मिळालेली जमीन बाळूशेठ यांनी नालासोपाऱ्यातील परप्रांतीयांना विकली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वनहक्काच्या जमिनीची परप्रांतीयांकडे सर्रास विक्री होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बेकायदेशीर व्यवहारांची सखोल चौकशी करून कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक प्रशासन व वनविभाग यावर कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment