पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहात अवाजवी दर – सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड!

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहात अवाजवी दर – सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड


पालघर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरील दालन क्रमांक १२ मधील उपाहारगृह हे सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. येथे अवाजवी दराने खाद्यपदार्थ विकले जात असून, ग्राहकांना कोणतेही दरपत्रक न देता मनमानी किंमती आकारल्या जात आहेत.

पालघर बोईसर मुख्य रस्त्यालगत असलेल्या जिल्हा प्रशासकीय भवनात अनेक नागरिक आपली सरकारी कामे घेऊन येतात. तासनतास वाट पाहावी लागत असल्याने उपाहारगृहाशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, येथे खाद्यपदार्थ महागडे असूनही अपुरे दिले जात असल्याने ग्राहकांची पोटभर भूक भागत नाही.


पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, वाडा आदी दुर्गम भागांतून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. मात्र, शासनाने सुरू केलेल्या या उपाहारगृहात त्यांना पंचतारांकित हॉटेलसारखे महागडे जेवण परवडत नसल्याने काहींना उपाशीच परतावे लागत आहे.


◾ना दरपत्रक, ना पक्के बिल – आर्थिक गैरव्यवहाराचा संशय


नियमांनुसार प्रत्येक उपाहारगृहात खाद्यपदार्थांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे, मात्र येथे दरपत्रक लावण्यात आलेले नाही किंवा टेबलवर उपलब्ध करून दिले जात नाही. ग्राहकांकडून जेवणाचे पैसे घेतले जातात, पण पक्के बिल दिले जात नाही, त्यामुळे GST चोरीचा गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


◾प्रशासन डोळे झाकून का बसले आहे? 


या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून "जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या उपाहारगृहावर कोणतेही नियंत्रण आहे का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर हे उपाहारगृह शासनाच्या देखरेखीखाली चालत असेल, तर महागाईवर नियंत्रण का नाही? आणि जर खासगी व्यक्ती चालवत असेल, तर त्यांची आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी का होत नाही?


◾नागरिकांची मागणी – तातडीने चौकशी करून कारवाई करा!


नागरिकांनी या प्रकाराची तपासणी करून योग्य दर लागू करावेत, बिले देण्यास सक्ती करावी आणि गैरव्यवहार झाल्यास कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.









Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक