महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन
बोईसर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शस्त्र, नाणी आणि पत्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सोमवार, १७ व १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या ऐतिहासिक प्रदर्शनाचे सर्कस ग्राउंड, बोईसर येथे आयोजन करण्यात आले आहे.
शिवकालीन शस्त्रास्त्रांचा दुर्मीळ खजिना पाहण्याची संधी
या प्रदर्शनात शिवकालीन युद्धात वापरण्यात आलेली ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, दुर्मीळ नाणी, पत्रे आणि त्यांची ऐतिहासिक माहिती उपस्थितांना पाहता आणि समजून घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देणाऱ्या वस्तूंचे हे अनोखे प्रदर्शन इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
प्रदर्शनाच्या आयोजन
या ऐतिहासिक उपक्रमाचे व्यवस्थापन भावेश चुरी, विशाल जाधव, धिरज गावड, विजय गांगुर्ड, जालीम तडवी, विनायक कोळसकर, सत्यम मिश्रा, तन्मय संखे, पवन गुप्ता आणि पंकज चौरसिया यांनी केले आहे.
Comments
Post a Comment