अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी पालघर पोलिसांची कारवाई – दोन आरोपी ताब्यात

अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी पालघर पोलिसांची कारवाई – दोन आरोपी ताब्यात


पालघर : पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आलेल्या पार्श्वभूमीवर जव्हार पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल १९.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ५ मार्च २०२५, रोजी खंबाळा दुरक्षेत्र हद्दीत दादरा नगर हवेली ते जव्हार मार्गावर पोलीस पेट्रोलिंग दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाल धाब्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी एक तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो (क्र. GJ-19 X 8692) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तो अडवला. टेम्पो चालक बनेसिंग बद्रीलाल राठोर (वय ३६, मुळगाव – इंदूर, मध्यप्रदेश) आणि त्याचा साथीदार महेंद्रसिंग राजुसिंग रावत (वय २२, मुळगाव – अजमेर, राजस्थान) यांनी टेम्पो रिकामा असल्याचे सांगितले.


मात्र, झडती घेतल्यावर टेम्पोच्या खालच्या भागात पत्र्याचे दोन गुप्त कप्पे सापडले. ते उघडून पाहिले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू आणि बियरचे बॉक्स आढळून आले. या अवैध दारूचा एकूण बाजारमूल्य १९,७०,१२०/- रुपये इतका आहे. या प्रकरणी आरोपींवर मुंबई दारुबंदी अधिनियम कलम ६५(अ) अंतर्गत जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५४/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उप.नि. स्वप्नील सावंतदेसाई, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर करीत आहेत.


सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. भागिरथी पवार, परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक, पोनि/किशोर मानभाव, प्रभारी अधिकारी, जव्हार पोलीस ठाणे, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोअं बजरंग अमनवाड, पो.अंम/ संदिप राजगुरे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोहवा / विटकर, पोहवा./ गायकवाड, पोना/ गाटे, पोना/ विनोद धाक्या वारंगडे, पोअं/ बोरसे सर्व नेमणुक जव्हार पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक