अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास थेट बडतर्फी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास थेट बडतर्फी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ठाणे : राज्यातील कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा अमली पदार्थाच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्याला तात्काळ बडतर्फ केले जाईल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमासाठी ठाण्यात आले होते. या कार्यक्रमाआधी त्यांनी रेमंड गेस्ट हाऊसमधील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.


मुख्यमंत्रींसोबत गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस दलाला स्वच्छ व निष्कलंक ठेवण्यावर भर देत अमली पदार्थ प्रकरणांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांचा कोणताही सहभाग सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलिस दलातील शिस्त आणि पारदर्शकतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक