युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे बोईसर येथे मेगा एमएसएमई आऊटरीच कॅम्पचे आयोजन

युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे बोईसर येथे मेगा एमएसएमई आऊटरीच कॅम्पचे आयोजन


बोईसर :  युनियन बँक ऑफ इंडिया, बोरिवली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने 6 मार्च 2025 रोजी बोईसर, पालघर येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (MSME) साठी मेगा आऊटरीच कॅम्प आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जीका, जपानचे श्री. योशियोका काजुकी, युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई विभागाचे मुख्य महाप्रबंधक आणि विभागीय प्रमुख श्री. अभिजीत बसाक, टीमा, बोईसरचे अध्यक्ष श्री. वेलजी गोगरी आणि सचिव श्री. एस.आर. गुप्ता उपस्थित होते.



याशिवाय
युनियन बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बोरिवली क्षेत्राचे उप-महाप्रबंधक श्री. राहुल जुयाल, उप-क्षेत्र प्रमुख श्री. सावन शिव, एमएलपी प्रमुख श्री. हिमांशु व्यास आणि बँकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘एम्पॉवर हर’ उपक्रमांतर्गत पाच महिला स्वयंसेवी गटांनी वॉकेथॉनचे आयोजन केले.


कॅम्पचे उद्दीष्ट आणि उपक्रम


या मेगा कॅम्पचे उद्दीष्ट उद्योजकता वाढवणे, सरकारी योजनांची माहिती देणे आणि एमएसएमई क्षेत्राला आर्थिक सहाय्य पुरवणे हे होते. बोरिवली क्षेत्रातील विविध शाखांनी आपल्या एमएसएमई ग्राहकांसह या कॅम्पमध्ये सहभाग घेतला.


प्रमुख लाभ आणि योजना –


◾युनियन एमएसई सहायता अंतर्गत संपार्श्विक मुक्त कर्जांचे वाटप


◾युनियन नारी शक्ती योजनेद्वारे महिला उद्योजकांना मदत


◾एसएचजी (स्वयं सहायता गट), पीएमएमवाई, पीएम विश्वकर्मा, पीएमजेडीवाय आणि जीवन ज्योती बीमा योजनांचा समावेश


◾चालू आणि बचत खाती उघडण्याच्या विशेष सुविधा

उपस्थित लाभार्थी आणि वितरित कर्ज


या कॅम्पमध्ये 400 हून अधिक लाभार्थींनी सहभाग घेतला. यात 61 नवीन खात्यांना मंजुरी देण्यात आली आणि पीएमईजीपी, सीएमईजीपी आणि मुद्रा लोन योजनेंतर्गत ₹10 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त, सुमारे ₹80 कोटींची लीड जनरेशन करण्यात आली.


युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे या उपक्रमामुळे बोईसर आणि पालघर भागातील लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


◾एमएसएमई क्षेत्राला चालना देण्यासाठी सकारात्मक पाऊल – खासदार सावरा


खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी यूनियन बँक ऑफ इंडिया तर्फे केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी पालघरमध्ये होत असल्याचे स्वागतार्ह पाऊल असल्याचे सांगितले. "यामुळे एमएसएमई नोंदणीकृत लघुउद्योगांना आर्थिक मदत मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल," असे ते म्हणाले.


◾टीमा अध्यक्ष श्री. वेलजी गोगरी म्हणाले की, बँकेच्या सुलभ धोरणांमुळे उद्योजकांना कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. तथापि, बँकांकडून कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.




Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक