गणेशनगर रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न– २० लाखांचा निधी मंजूर
गणेशनगर रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न– २० लाखांचा निधी मंजूर
बोईसर : गणेशनगर परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या विकासासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(दि. ७ मार्च २०२५) या विकासकामाचा शुभारंभ भूमिपूजन सोहळ्याने करण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि बोईसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निलम संखे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा, कामिनी सुतार तसेच गणेशनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना निलम संखे म्हणाले "गणेशनगरच्या नागरिकांची चांगल्या रस्त्यासाठीची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण होत आहे. ग्रामपंचायतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील."
१५० मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गती देण्यात आली आहे. या विकासकामामुळे स्थानिक रहिवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.
गणेशनगरमधील नागरिकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले असून, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment