पालघर आणि डहाणू नगर परिषदेकरिता ‘गुरखा’ रेस्क्यू टेंडर वाहनांचे लोकार्पण

पालघर आणि डहाणू नगर परिषदेकरिता ‘गुरखा’ रेस्क्यू टेंडर वाहनांचे लोकार्पण


पालघर – आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने पालघर आणि डहाणू नगर परिषदेकरिता अत्याधुनिक गुरखा मिनी रेस्क्यू टेंडर वाहने प्रदान करण्यात आली. आज या वाहनांचे लोकार्पण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पार पडले.

या सोहळ्याला पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, तसेच पालघर आणि डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुरखा रेस्क्यू टेंडर वाहनांची वैशिष्ट्ये:

  • छोट्या प्रकारच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम
  • व्हीआयपी ताफ्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना
  • शोध व बचाव कार्य तसेच वाहन अपघातातील बचावासाठी उपयुक्त
  • 20 टनांपर्यंत वजन उचलण्याची क्षमता असलेली स्टेपनी
  • 50 लिटर फोम टाकी – केमिकल आग विझवण्यासाठी प्रभावी
  • 300 लिटर पाण्याची उच्च दाब क्षमतायुक्त टाकी – 20 मिनिटे सलग फायर फायटिंगची क्षमता
  • प्रोझीमिटी फायर सूट – अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सूट

ही अत्याधुनिक वाहने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यास मदत करतील. आपत्तीच्या प्रसंगी जलद प्रतिसाद आणि प्रभावी बचावकार्य हे या वाहनांचे प्रमुख उद्दिष्ट राहील.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक