बोईसरमध्ये अस्वच्छतेचा विळखा: चायनीज सेंटरकडून नाल्यात बेकायदेशीर कचरा टाकण्याचा प्रकार उघड
बोईसरमध्ये अस्वच्छतेचा विळखा: चायनीज सेंटरकडून नाल्यात बेकायदेशीर कचरा टाकण्याचा प्रकार उघड
बोईसर : खैरेपाडा येथील यशवंत सृष्टी परिसरात असलेल्या एस.के. चायनीज कॉर्नर कडून संजय नगर नाल्यात बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
परिसरात दुर्गंधी, रोगराई आणि वाहतुकीला अडथळा
स्थानिक रहिवाशांच्या मते, एस.के. चायनीज कॉर्नर आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा थेट संजय नगर नाल्यात फेकत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, घाणपातंग्यांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. विशेषतः मांसाहारी कचऱ्यामुळे रस्त्यावर भटकी कुत्री आणि डुकरांची संख्या वाढली असून, यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे.
पदपथ अडवला, वाहतूक कोंडीचा प्रश्न
चायनीज सेंटरने पदपथावर अनधिकृतपणे दुकान थाटले आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. संध्याकाळच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही दुर्लक्ष करत आहे, असा आरोप होत आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना स्थानिक प्रशासन मात्र अशा बेकायदेशीर कृत्याकडे कानाडोळा करत असल्याची टीका केली जात आहे.
Comments
Post a Comment