जलजीवन मिशनच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह ; निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे जलजीवन मिशन योजना अडचणीत

जलजीवन मिशनच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह ; निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे जलजीवन मिशन योजना अडचणीत


डहाणू : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्याने अनेक गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अडसुळपाडा (तालुका डहाणू) येथे अलीकडेच बसवलेले गॅल्वनाईज्ड पाईप पाण्याच्या दाबाने फुटल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ठेकेदार कंपनीकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

◾निकृष्ट साहित्यामुळे वारंवार पाईप फुटण्याच्या घटना

अडसुळपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पूर्वी एचडीपीई पाईप बसवण्यात आले होते. मात्र, पूर्वठेकेदार सेटी अँड सन्स इंजिनिअरिंग कंपनीने ते काढून निकृष्ट दर्जाचे गॅल्वनाईज्ड पाईप बसवले. त्यामुळे पाईप फुटण्याच्या वारंवार घटना घडत असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.


◾डहाणू दुर्घटनेनंतरही प्रशासन गंभीर नाही

याआधीही डहाणू तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणी टाकीचे स्ट्रक्चर कोसळून दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


◾राज्यात अनेक ठिकाणी तक्रारी, ग्रामस्थांमध्ये नाराजी

डहाणू तालुक्यासह खांडीआम्हद, वाडा तालुक्यातील क्वल्सीतल बालिवली, तसेच विक्रमगड तालुक्यातील शिळ (मोखाडा) भागातही जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.


◾जबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी

जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ही योजना राबवली जात आहे. मात्र, ठेकेदार कंपन्यांनी कामाच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याने सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे या प्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक