२० वर्षांपासून फरार दरोडेखोर वाणगाव पोलिसांच्या जाळ्यात

२० वर्षांपासून फरार दरोडेखोर वाणगाव पोलिसांच्या जाळ्यात


पालघर: वाणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास अटक करत मोठे यश मिळवले आहे. दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी देऊ जाण्या चिमाडा (रा. रुदाना, दादरा नगर हवेली) याला अखेर वाणगाव पोलिसांनी खानवेल, दादरा नगर हवेली येथून ताब्यात घेतले.


२००५ मधील गंभीर गुन्हा

सन २००५ मध्ये वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९/२००५ भा.द.वि. कलम ३९५, ३९७ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी व त्याच्या साथीदारांनी वसई अंबातपाडा येथे असलेल्या कार्यालयात शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. या दरोड्यात ४३,००० रुपये रोख, मोबाईल, एअर रायफल, पिस्तोल आणि अन्य मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.


गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

दि. ४ मार्च २०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि तुषार पाचपुते यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने खानवेल, दादरा नगर हवेली येथे सापळा रचून आरोपी देऊ जाण्या चिमाडा याला अटक केली.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी सपोनि तुषार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली पोहवा अरूण राऊत, पोहवा संतोष धांगडा आणि पोहवा प्रकाश भरभरे यांनी या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.


२० वर्षांनंतर न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल

गेल्या दोन दशकांपासून फरार असलेल्या या आरोपीच्या अटकेने वाणगाव पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पुढील तपास सुरू असून या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक