पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागू : अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्देश
पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागू : अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्देश
पालघर : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष भागडे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश दिनांक १८ मार्च २०२५ च्या ००.०१ वाजल्यापासून ते ३१ मार्च २०२५ च्या २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
◾या आदेशानुसार खालील बाबींवर बंदी घालण्यात आली आहे:
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्याजोग्या वस्तू जवळ बाळगणे.
कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे.
दगड किंवा अन्य क्षेपणास्त्रे, तसेच ती सोडण्यासाठी लागणारी उपकरणे जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
व्यक्तींच्या, मृतदेहांच्या आकृती किंवा प्रतिकृतींचे सार्वजनिक प्रदर्शन करणे.
सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे.
अश्लील किंवा भडक भाषणे करणे, अवमानकारक चित्रे, चिन्हे किंवा फलक तयार करणे व त्यांचे प्रदर्शन करणे.
◾काही लोकांना सवलत:
हा आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या अनुषंगाने, तसेच अपंग व्यक्तींना आधारासाठी लाठी-काठी बाळगण्यास लागू राहणार नाही. तसेच, लग्न सोहळे, प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर हा निर्बंध राहणार नाही.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा संबंधित कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Comments
Post a Comment