पालघरमध्ये भीषण अपघात: भरधाव बोलेरोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अन्य प्रवासी गंभीर जखमी

पालघरमध्ये भीषण अपघात: भरधाव बोलेरोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अन्य प्रवासी गंभीर जखमी


पालघर : पालघर-मनोर रोडवर रेमी ग्रुप कंपनीच्या गेटसमोर भरधाव बोलेरो पिकअपने रिक्षा आणि स्कुटीला जोरदार धडक दिल्याने २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७.४५ वाजता घडला.


◾अपघाताचा घटनाक्रम

मृत महिला उज्वला उमेश जाधव (वय २७, रा. देवखोप) या बोईसरमधील निरामय हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्या बोईसरहून आपल्या घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.


अपघाताच्या वेळी उज्वला जाधव तीन-आसनी रिक्षात बसल्या होत्या. याच दरम्यान, मनोर बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप (क्रमांक GJ-08 CK-6909) ने नियंत्रण सुटल्याने रिक्षा आणि स्कुटीला जोरदार धडक दिली.


या धडकेत उज्वला जाधव यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच, रिक्षा आणि स्कुटीवरील अन्य प्रवासीही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बोलेरो गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.


◾उपचारादरम्यान मृत्यू

स्थानिक नागरिक आणि उज्वला जाधव यांच्या कुटुंबीयांनी जखमींना तात्काळ सरकारी दवाखाना, पालघर येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ८.४५ वाजता डॉक्टरांनी उज्वला जाधव यांना मृत घोषित केले.


◾पोलिस कारवाई आणि पुढील तपास

या प्रकरणी उज्वला जाधव यांचे दीर सिद्धेश सखाराम जाधव यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, बोलेरो पिकअपच्या अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 106(1), 125(a), 125(b), 281, 324(4) तसेच मोटर वाहन अधिनियम 1988 अंतर्गत 184, 134(A), 134(B), 187 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस निरीक्षक किशोर पुरुषोत्तम चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपी चालक लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


◾परिसरात हळहळ व्यक्त

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रहदारी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.








Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक