पालघर जिल्ह्यातील चार खलाशी समुद्रात बेपत्ता, मासेमारी बोटीचा अपघात
पालघर जिल्ह्यातील चार खलाशी समुद्रात बेपत्ता, मासेमारी बोटीचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वनगबार बंदरातून १८ फेब्रुवारी रोजी मासेमारीसाठी निघालेली "निराली" नावाची बोट समुद्रात मासेमारी करून परतत असताना अपघातग्रस्त झाली. या बोटीत पालघर जिल्ह्यातील सहा आणि गुजरातमधील चार असे एकूण दहा खलाशी होते. अपघातानंतर झाई गावातील अक्षय प्रभू वाघात, अमित अशोक सुमर, सूरज विलास वळवी, सूर्या अशोक शिंगडा आणि गुजरातमधील दिलीप बाबू सोलंकी हे पाच जण बेपत्ता झाले आहेत.
दरम्यान, झाई गावातीलच अनिल रमेश वांगड आणि जलाराम गोविंद वळवी हे दोघे सुखरूप बचावले आहेत. सध्या या घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू असून, गुजरात पोलिसांनी घोलवड पोलीस ठाण्यात माहिती कळवली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी साहेबराव कचरे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment