वाढवण बंदराच्या विरोधाला उधान, मच्छिमारांनी समुद्रातील सर्वेक्षण रोखले, पोलिसांची कारवाई

वाढवण बंदराच्या विरोधाला उधान, मच्छिमारांनी समुद्रातील सर्वेक्षण रोखले, पोलिसांची कारवाई


पालघर : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला स्थानिक मच्छिमार, पर्यावरणवादी आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रात सुरू असलेले सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखले. परवानगीशिवाय सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करत मच्छिमार आक्रमक झाले आणि थेट सर्वेक्षण स्थळी धडकले. या प्रकरणी संबंधित सर्वेक्षण कंपनीला पालघर पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


मच्छिमारांचा संताप, सर्वेक्षण रोखले

वाढवण बंदर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला स्थानिकांचा विरोध असूनही सरकारकडून हालचाली सुरूच आहेत. स्थानिकांनी वारंवार निषेध करूनही संबंधित कंपनीने समुद्रात सर्वेक्षण सुरू केले. मात्र, या सर्वेक्षणासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. परिणामी, मच्छिमारांनी थेट खोल समुद्रात जाऊन सर्वेक्षण बंद पाडले.


पोलिसांची कारवाई, कंपनीला नोटीस

सर्वेक्षणावर हरकत घेत मच्छिमारांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या आंदोलनानंतर पालघर पोलिसांनी कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग लिमिटेड या सर्वेक्षण कंपनीला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले आहे.


वाढवण बंदराला विरोध का?

वाढवण बंदराच्या उभारणीमुळे समुद्रातील पारिस्थितिकी तंत्रावर परिणाम होणार असल्याची स्थानिकांची भीती आहे. हा भाग मत्स्यबीज उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, बंदरामुळे मासेमारी धोक्यात येईल. तसेच, समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यास किनारपट्टी भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या भागाचा समावेश डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्याने पर्यावरणवाद्यांचाही या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.


स्थानिकांचा संघर्ष सुरूच

स्थानिकांनी वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध करत पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मच्छिमारांसह पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत हा प्रकल्प थांबवण्यासाठी पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक