वाडा पोलिसांची मोठी कारवाई: ५ किलो गांजासह दोन जणांना अटक
वाडा पोलिसांची मोठी कारवाई: ५ किलो गांजासह दोन जणांना अटक
पालघर : वाडा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ किलो ७५ ग्रॅम गांजा, एक मोटार कार आणि मोबाईलसह एकूण ३.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
११ मार्च २०२५ रोजी वाडा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, खोडाळा-वाडा मार्गावर एका कारमधून गांजाची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडा पोलिसांनी हारोसाळे गावाजवळील तलावाजवळ सापळा रचला. सायंकाळी ५:४५ वाजता खोडाळ्याच्या दिशेने येणारी मारुती सुझुकी आल्टो (MH-15-BD-7280) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला थांबवले.
गाडीतील दोघांची चौकशी केली असता त्यांची नावे फारुक नजीर शेख (५३, रा. अस्वली स्टेशन, इगतपुरी) आणि अविनाश दिलीप राजभोज (२७, रा. अस्वली स्टेशन, इगतपुरी) असल्याचे समजले. गाडीची तपासणी केल्यानंतर ड्रायव्हर सीटच्या मागे काळ्या-पिवळसर रंगाच्या पिशवीत गांजाचे दोन बॉक्स सापडले. त्यामध्ये ५ किलो ७५ ग्रॅम वजनाचा गांजा सापडल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेढे करत आहेत.
सदरची कारवाई ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शानाखाली दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे, पोउपनिरी/सागर मालकर, पोउपनिरी/सुमेध मेढे, पो.हवा./गुरुनाथ गोतारणे, पोअं/गजानन जाधव, पोअं/चेतन सोनावणे, पोअं/संतोष वाकचौरे यांनी केली.
वाडा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ तस्करीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment