मंदिरातील चोरी प्रकरणी पालघर पोलिसांची मोठी कामगिरी – आरोपी अटकेत

मंदिरातील चोरी प्रकरणी पालघर पोलिसांची मोठी कामगिरी – आरोपी अटकेत


पालघर : वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचणी पिंपळनाका, डहाणू येथे असलेल्या सामुद्रीमाता मंदिरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करत पालघर पोलिसांनी अज्ञात आरोपीला अटक केली आहे.


दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मागील दरवाज्याचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि चांदीचा मुकुट, शंकर देवाची चांदीची मूर्ती, तसेच दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण ₹२,३५,००० किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०९/२०२५, भा.दं.सं. कलम ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते (वाणगाव पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.


गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सुभाष शितलप्रसाद केवट (वय ४२, रा. कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक, मुळगाव पिपरीस, जि. संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वनवे (वाणगाव पोलीस ठाणे) करत आहेत.


सदरची कामगिरी ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/तुषार पाचपुते, प्रभारी अधिकारी वाणगाव पोलीस ठाणे, पोउपनि/रविंद्र वानखेडे, पोउपनि/राठोड पोहवा/संदिप सरदार, पोहवा / राकेश पाटील, पोहवा/गायकवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच सफौ/भुषण संखे, पोहवा/समिर संखे नेम. वाणगाव पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


पालघर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपी गजाआड झाला असून, नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक