किरकोळ वादातून नवऱ्यानं बायकोची दगडानं ठेचून केली हत्या
किरकोळ वादातून नवऱ्यानं बायकोची दगडानं ठेचून केली हत्या
पालघर : पालघर येथील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरोंडे येथे धक्कादायक घटना घडली आहे. १० मार्चला रात्रीच्या सुमारास नवरा बायकोमध्ये भांडण झालं. भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. नंतर नवऱ्यानं बायकोला दगडानं ठेचून तिची हत्या केली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे.
पालघरच्या कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरोंडे येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आरोपी पती सुरेश भोईर यानं बायकोची दगडानं ठेचून हत्या केली आहे. यात पत्नी (वय वर्ष ५२) गुलाब सुरेश भोईर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
आधी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. नंतर भांडणाला सुरूवात झाली. वाद टोकाला गेला. नंतर रागाच्या भरात आरोपी सुरेश भोईर यानं पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं.
तसेच आरोपीविरोधात ३०२ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कासा ठाण्यातील पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Comments
Post a Comment