पालघरमध्ये 28 मार्च रोजी जनता दरबाराचे आयोजन
पालघरमध्ये 28 मार्च रोजी जनता दरबाराचे आयोजन
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष शिबिर
या जनता दरबारात नागरिक त्यांच्या समस्या मांडू शकणार असून, त्वरित निवारणासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
◾नागरिकांसाठी विशेष सुविधा
या जनता दरबारात 20 टेबलांवर विविध विभागांचे अधिकारी नागरिकांच्या अर्जांची नोंदणी करून समस्या सोडवण्यासाठी सज्ज असतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 10 संगणक बसवण्यात येणार असून, येथे नागरिकांचे अर्ज नोंदवून टोकन वाटप केले जाणार आहे. तसेच, दुसऱ्या मजल्यावर 20 टेबलांवर संबंधित विभागांचे अधिकारी अर्जांचे त्वरित निवारण करतील.
◾समाधान शिबिर आणि लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
जनता दरबारादरम्यान समाधान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समाधान पत्रांचे वाटप करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले.
◾20 फेब्रुवारीच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या जनता दरबारात 759 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी 302 अर्ज महसूल विभागाचे होते, तर 457 अर्ज इतर विभागांचे होते.
◾नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
28 मार्च रोजी होणाऱ्या जनता दरबारात नागरिकांनी प्रत्यक्ष हजर राहून आपल्या तक्रारी व समस्या मांडाव्यात व त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.
Comments
Post a Comment