मोटारसायकल चोरी करणारे दोघे ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची उत्तम कामगिरी

मोटारसायकल चोरी करणारे दोघे ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची उत्तम कामगिरी 


पालघर – केळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी केळवा येथील बैतरणा रेल्वे ब्रिज परिसरातून ३५,००० रुपये किमतीची अॅक्टीवा स्कूटी चोरीस गेली होती. याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून आरोपींचा शोध घेण्यात आला. ३१ जानेवारी २०२५ रोजी विशाल रघुनाथ नाईक (वय ३६, नालासोपारा) आणि देवा लक्ष्मण थापा (वय ३५, नेपाळ) यांना अटक करण्यात आली. या दोघांकडून चोरीला गेलेली अॅक्टीवा स्कूटी आणि त्यांच्याकडून वापरलेली एक अन्य मोटारसायकल जप्त करण्यात आली.

विशाल नाईक आणि देवा थापा यांच्यावर पूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरी-१, चोरी-८, शरिराविरुध्द ४, अवैद्य दारु-१, बेवारस मालमत्ता बाळगणे-२  अशा १६ गुन्ह्यांचा त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यात अहवाल आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.


संपूर्ण कार्यवाही पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक  विनायक नरळे, उप विभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर व सपोनि/ विजया गोस्वामी, केळवा पो. ठाणे यांचे सुचनाप्रमाणे श्रेणी पोउनि/राजेश वाघ, पोहवा/संदिप सरदार, पोहया/राकेश पाटील ने. स्थागुशा पालघर व सफी/संजय गुरव व पोअमं/सागर सरीगर, पोअमं/जयदिप सांबरे नेम. केळवा पो.ठाणे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून, दोन आरोपी व दोन मोटार सायकली जप्त केलेल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक