"ग्रामपंचायतच्या नाल्यात रासायनिक पाणी सोडल्याचा प्रकार उघड!"
"ग्रामपंचायतच्या नाल्यात रासायनिक पाणी सोडल्याचा प्रकार उघड!"
बोईसर : बोईसर ग्रामपंचायतीच्या सदस्य बंदिनी पाटील यांचे पती बाळकृष्ण उर्फ बाळू पाटील यांनी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाणी ग्रामपंचायतीच्या नैसर्गिक नाल्यात विल्हेवाट लावत असताना पंचायत समिती सदस्य अनिल रावते यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
२३ जानेवारी रोजी रात्री दांडी पाडा येथील नैसर्गिक नाल्यात कौस्तुभ इंटरप्राईजेस नावाच्या पिवळ्या रंगाच्या टॅंकरमधून रासायनिक पाणी सोडत असल्याचे अनिल रावते यांच्या लक्षात आले. याचे दृश्य एका व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले, ज्यामुळे या प्रकरणाची चर्चा वाढली. सामाजिक कार्यकर्ते अमृत धोडी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह यांना लेखी तक्रार दिली होती, परंतु तक्रारीवर योग्य पद्धतीने कारवाई न करता त्या बोईसर ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्या गेल्या. यावर अमृत धोडी यांनी आरोप केले की, अधिकारी विरेंद्र सिंह यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असुन बोईसर ग्रामपंचायतीच्या सदस्य बंदिनी पाटील यांचे पती बाळकृष्ण उर्फ बाळू पाटील हेच या प्रकरणात गुंतलेले असताना ग्रामपंचायतीचा तात्पुरता कर्मचारी नरेश सोलंकी यांच्या सहकार्याने बाळकृष्ण उर्फ बाळू पाटील असे अवैध कृत्य करत असल्याचे आरोप अमृत धोडी यांनी केलेला
सूत्रांच्या माहितीनुसार, औद्योगिक क्षेत्रातील कारखाने रासायनिक घनकचऱ्याची विल्हेवाट प्रक्रियेसाठी केंद्रात न पाठवता, कमी खर्चात सक्शन पंपाच्या माध्यमातून नैसर्गिक नाल्यात सोडतात. यामध्ये बजाज हेल्थकेअर कारखान्याचा रासायनिक पाणी बोईसर येथील नाल्यात सोडला जात आहे.
या प्रकरणात बोईसर ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. या गंभीर पर्यावरणीय मुद्द्यावर तातडीने योग्य कारवाई होईल का, याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment