पाण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

पाण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांचे जिल्हा परिषद कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण


पालघर : वसई विरार महानगरपालिकेला मासवण नदीतून पाणी पुरवठा होत असला तरी, मासवण आणि त्याच्या आसपासच्या पाच गावांतील नागरिकांना पाणी मिळत नाही. गेल्या १५ वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मासवण, लोवरे, वसरोली, खरशेत, निहे या पाच गावांचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही. करोडो रुपये खर्च करून देखील पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याचा आरोप उपोषणकर्ते सचिन पिंपळे यांनी केला आहे.

सचिन पिंपळे यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'हर घर जल' योजना कागदावरच राबवली जात आहे. मासवण पाणीपुरवठा योजनेंतर्गत मे. जयदीपराज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले होते. २०१८-१९ साली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ५.४६ कोटी रुपये खर्च करण्यात आले तरी योजना पूर्ण करण्यात अपयश आले. त्यानंतर २०२१-२२ साली जल जीवन मिशन योजनेतून ४.५२ कोटी रुपये खर्च करून देखील पाणी पुरवठा न झाल्याचे जिल्हा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदार मितेश पारेख आणि मे. जयदीपराज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे मालक आर. एल. गुले यांच्यावर आरोप आहेत. यापूर्वी देखील मितेश पारेख यांनी अनेक योजना कागदावरच राबविल्या असल्याचा आरोप आहे. सचिन पिंपळे यांनी याआधी पाणीपुरवठा अभियंत्यांना समस्या कळवली होती. तरीही पिण्याच्या पाणी मिळत नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या उपोषणात मासवण, लोवरे, वरसोली, खरशेत, निहे गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ तसेच नागझरी - मासवण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.


◾शास्वत स्त्रोत असलेल्या मासवण नदीतून वसई विरार येथील नागरिकांची तहान भागवली जाते परंतु करोडो रुपये खर्च करून देखील हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. पाणीपुरवठा अभियंत्यांच्या निदर्शनास हि बाब आणून देखील पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. -

  सचिन जगदीश पिंपळे - मा पंचायत समिती सदस्य पालघर

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक