तारापूर औद्योगिक क्षेत्रात बांधकाम कामगार असुरक्षित: सुरक्षा उपकरणांचा अभाव

तारापूर औद्योगिक क्षेत्रात बांधकाम कामगार असुरक्षित: सुरक्षा उपकरणांचा अभाव


बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात एस के एफ एफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर जे १३८/१ येथे सुरू असलेल्या बांधकाम कामात, कामगारांच्या सुरक्षा नियमांची मोठ्या प्रमाणावर उलंघन होत आहे. काम करत असलेल्या मजुरांना आवश्यक सुरक्षा उपकरणे, जसे हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जुराबे इत्यादी, उपलब्ध करून दिली जात नाहीत.


सध्या काम करणारे कामगार ३० ते ४० फूट उंचावर काम करत असून, यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे. सुरक्षा उपकरणांची उणीव असलेले हे कामगार अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करत आहेत. असुरक्षित कामकाजामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका कायम आहे, ज्यामुळे कामगारांच्या जीवनाला धोका निर्माण होतो.


यापूर्वीही तारापूर औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या असून, त्यांच्यानंतरही कामगारांच्या सुरक्षा संदर्भात कोणतीही पावले उचलली जात नाहीत. अशा परिस्थितीत कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक