अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या; मृतदेह सापडला बंद दगड खदानीत
अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या; मृतदेह सापडला बंद दगड खदानीत
पालघर : पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा बारा दिवसांपासून बेपत्ता असण्याचा प्रकरण अखेर उघडकीस आले. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा वाहनांसह मृतदेह आढळला.
तलासरी तालुक्यातील वेवजी येथील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार ३१ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. गुजरातमधील भिलाड नजीकच्या सरिगाम येथील बंद दगड खदानीत त्यांच्या वाहनासह मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. २० जानेवारी रोजी मुंबईला गेलेल्या अशोक धोडी यांनी घरी परतताना अपहरण झाल्याचे कुटुंबीयांनी तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयितांच्या नावाने गुन्हा दाखल केला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अविनाश धोडी, मनोज राजपूत आणि सुनील धोडी यांना ताब्यात घेतले. परंतु, तपासादरम्यान अविनाश धोडी आणि एक आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले. अंतीम तपासात, संशयितांनी दिलेल्या माहितीवरून १२ दिवसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह सरिगाम येथील दगड खदानीत त्यांच्या वाहनाच्या मागच्या भागात दोरीने बांधलेल्या स्थितीत सापडला.
या घटनेमुळे परिसरात शोक आणि संताप व्यक्त करण्यात येत असून, अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment