तीन नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत तारापूर पोलीस ठाण्या तर्फे जनजागृती
तीन नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत तारापूर पोलीस ठाण्या तर्फे जनजागृती
तारापूर : न्याय संहिता , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष संहिता या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. या कायद्याची जनजागृती व्हावी याकरिता तारापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांनी तारापूर येथील मोहम्मदी उर्दू स्कूल सभागृहात २ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता वरील नवीन तिन्ही कायद्याबाबत देऊन नव्या कायद्यातील तरतुदी आणि त्यानुसार शिक्षा काय असेल याचीही माहिती देण्यात आली .
सदर जनजागृती कार्यक्रमात शांतता मोहल्ला कमिटी सदस्य, मुस्लिम सुन्नत जमात तारापूर अध्यक्ष-सदस्य,महिला दक्षता कमिटी सदस्य, हिंदू- मुस्लिम प्रतिष्ठित नागरिक, सागर रक्षक दल ,पत्रकार, सरपंच , महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती तारापूर अध्यक्ष - सदस्य व पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.
Comments
Post a Comment