वरळी हिट अँड रन अपघातात महिलेचा मृत्यू ; शिंदे गटाचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

वरळी हिट अँड रन अपघातात महिलेचा मृत्यू ; शिंदे गटाचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात 


मुंबई : मुंबईच्या वरळी भागात झालेल्या हिट अँड रन अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

मुंबईतील वरळी येथे आज, रविवारी सकाळी 5.30 दरम्यान एक मोठा अपघात झाला. या अपघातात एका कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेलं. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) महिलेचा मृत्यू झाला तर पती थोडक्यात बचावले. परंतु, अपघातानंतर या कारमधील लोकांनी पळ काढला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या कारने अपघात झाला ती कार शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा चालवत होता. त्यांचा ड्रायव्हरही यावेळी कारमध्ये उपस्थित होता. आता याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाखवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तत्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. 

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी