गौसिया बेकरी मधील पदार्थ खाणे ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक
गौसिया बेकरी मधील पदार्थ खाणे ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक
बोईसर : बोईसर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, प्रमुख वर्दळीच्या ठिकाणांसह थेट गल्लीबोळातही बेकरी उत्पादन घेणाऱ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. अनेक व्यावसायिक, दुकानदारांकडून उत्पन्नाच्या हव्यासापाेटी नियमांना मात्र तिलांजली दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथिल अलसिफा गल्लीत न्यू गौसिया बेकरीत खाद्य पदार्थ तयार करताना अन्नसुरक्षा व औषध सुरक्षा विभागाची व बेकरी संबधित असणाऱ्या कुठल्याही विभागाची परवानगी घेतलेली नसून, निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ तयार केले जात आहेत. त्या मध्ये टोस, बटर, खारी, पाव असे अनेक बेकरी खाद्य पदार्थ तयार केले जाते हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक आवडीने खात असून या बेकरीत व बाहेर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असताना भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न सामान्य ग्राहकाकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान शासकीय भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम करून न्यू गौसिया बेकरीत खाद्य पदार्थ तयार करताना स्वच्छता व इतर सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असताना लाचखोर अधिकारी या कृत्यांना आटोक्यात आणणार की बघ्याची भूमिका बजावणार?
Comments
Post a Comment