डॉक्टरांची अपॉइमेंट तत्काळ लावण्यासाठी रुग्णान कडून ऑनलाइन पेमेंट मांगुन फसवणूक करणारी टोळी बोईसर शहरात सक्रिय
डॉक्टरांची अपॉइमेंट तत्काळ लावण्यासाठी रुग्णान कडून ऑनलाइन पेमेंट मांगुन फसवणूक करणारी टोळी बोईसर शहरात सक्रिय
बोईसर :- लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या भारतभर सक्रिय आहेत, त्यांच्यामार्फत देशभरातील लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक केली जाते. ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार या टोळ्या आत्मसात करत असतात आणि अगदी सहजपणे लोकांना या टोळ्या त्यांच्या विळख्यात अडकवतात. ओटीपीची मागणी करुन, बँक डिटेल्स मागून खात्यातले सर्व पैसे गायब करण्याचं काम या लुटारु टोळ्या करत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार बोईसर शहरात खासगी रुग्णालयात डॉक्टरांची तत्काळ अपॉइमेंट कॉल द्वारे लावायचे असल्यास ऑनलाईन पेमेंट मांगवून रुग्णाची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे .अनेकांना कॉल करत फसवेगिरी सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयात रग्ण हे घरूनच मोबाईल वरून कॉल करुत अपॉइमेंट घेत असतात. त्या खासगी रुग्णालयाचा नंबर हॅक करत कॉल केलेल्या रुग्णांना कॉल केला जातो आणि खासगी रुग्णालयात डॉक्टरांची ओपीडी साठी अपॉइमेंट घेणार असतील तर ऑनलाईन पेमेंट करा तत्काळ नंबर लावला जाईल असे रुग्णाला सांगत पेमेंट करायला लावतात आणि जेव्हा रुग्ण स्वतः रुग्णालयात पोहचल्या नंतर त्याची ऑनलाईन फसवणूक झाली असल्याचे रुग्णालयातून समजते.
अनेकांची ऑनलाईन फसवणूक झाल्या नंतर लगेच, आमच्या कडे ऑनलाईन पेमेंट वर कोणतीही ओपीडी अपॉइमेंट नाही असा फलक सध्या शहरातील आनंद हॉस्पिटल मध्ये लावण्यात आला आहे.
कृपया असे फसवे कॉल टाळावे असे डॉक्टरांकडून आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment