पालघरमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त ; दोन हजार गर्भवती माता १९ वर्षाखालील
पालघरमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त ; दोन हजार गर्भवती माता १९ वर्षाखालील
पालघर : पालघर जिल्ह्यात ३६,१६८ गर्भवती माता असून यामध्ये तब्बल २४६२ गर्भवती माता या १९ वर्षाखालील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
मोखाडा तालुक्यात एका अल्पवयीन गर्भवती मातेचा मृत्यू झाल्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये डहाणू तालुक्यात तब्बल ७४३ गर्भवती माता १९ वर्षा खालील असून त्या खालोखाल जव्हार तलासरी आणि विक्रमगड तालुक्यात अल्पवयीन मातांचा आकडा अधिक आहे . पालघर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याचं यावरून स्पष्ट होत असून या बालविवाहांमुळेच बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण यांची आकडेवारी देखील मोठी आहे. या आकडेवारीमुळे पालघर जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांना रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कठोर पावलं उचलावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली आहे.
Comments
Post a Comment